28 November 2020

News Flash

राजकुमार रावने ‘बुगी वुगी’साठी दिलं होतं ऑडिशन; परीक्षक म्हणाले..

१९९६ मध्ये सुरु झालेल्या 'बुगी वुगी' या शोची प्रचंड क्रेझ होती.

राजकुमार राव

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव लवकरच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणार आहे. एकेकाळी छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या ‘बुगी वुगी’ या डान्स शोसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा त्याने केला. १९९६ मध्ये सुरु झालेल्या ‘बुगी वुगी’ या शोची प्रचंड क्रेझ होती. जावेद जाफरी या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होता.

“मी अकरावीत असताना माझ्या छोट्या भावाला घेऊन मुंबईत बुगी वुगीसाठी ऑडिशन देण्यासाठी आलो होतो. पण तेव्हा माझी निवड होऊ शकली नव्हती. आता इतक्या वर्षांनी डान्सच्या मंचावर येऊन मला खूप आनंद होतोय”, असं तो म्हणाला. राजकुमार रावसोबत यावेळी अभिनेत्री नुशरत भरुचानेही हजेरी लावली होती. ९०च्या दशकातील गाण्यांवर राजकुमार खूप भन्नाट डान्स करत असल्याचं तिने उपस्थितांना सांगितलं.

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’मधील माधवी भाभी घेते इतकी फी; १२ वर्षांपासून करतेय काम

हंसल मेहता दिग्दर्शित ‘छलांग’ या चित्रपटात राजकुमार व नुशरत भूमिका साकारणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दोघांनी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. ‘छलांग’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 11:33 am

Web Title: did you know that rajkummar rao had auditioned for boogie woogie as a teenager ssv 92
Next Stories
1 KBC 12 : ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत फूलबासन ठरल्या सर्वाधिक रक्कम जिंकणाऱ्या स्पर्धक
2 …जेव्हा पत्नीसाठी इरफान गायचा गाणं; पाहा बाबिलने शेअर केलेला ‘हा’ खास व्हिडीओ
3 महेश भट्ट यांच्या वकिलाने फेटाळले लविनाने केलेले आरोप; म्हणाले…
Just Now!
X