भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज दिलीप यांचा वाढदिवस असून, त्याच्या दोन दिवसांनंतर लगेच म्हणजेच १३ डिसेंबरला (रविवारी) त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
फोटो गॅलरीः ‘तुम जियो हजारों साल’: दिलीप कुमार @९३
‘द सब्स्टान्स अॅण्ड द शॅडो’ या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राची लेखिका आणि निकटवर्तीय उदय तारा नायर यांनी या बातमीस दुजोरा दिला आहे. आयएएनएसशी बोलताना नायर म्हणाल्या की, दिलीप कुमार यांच्या राहत्या घरी त्यांना पद्म विभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित राहतील. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याला दिलीप यांना उपस्थित राहत आले नव्हते.
आज दिलीप कुमार यांचा वाढदिवस आहे. मात्र, कोणताही मोठा सोहळा न करता घरच्यांसोबत भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
दिलीप कुमार यांना पद्म विभूषण पुरस्कार
१३ डिसेंबरला (रविवारी) दिलीप कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 11-12-2015 at 15:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar to be honoured with padma vibhushan on december