News Flash

सचिन पिळगांवकर आणखी एका गाण्यावरुन ट्रोल

याआधीही पिळगावकर यांना ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यावरुन ट्रोल करण्यात आले होते.

सचिन पिळगांवकर

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळख असलेले सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे अतिशय कमी वेळात व्हायरल झाले आहे. ‘दिमाग मे भूसा’ असे या गाण्याचे बोल असून ते पिळगावकर यांनी गायले आहे. याआधी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यावरुनही ते चांगलेच ट्रोल झाले होते. त्यामध्ये त्यांनी गाण्याबरोबरच अभिनयही केला होता. या गाण्यावरुन नेटीझन्सनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. तुमच्याकडून अशापद्धतीचे वागणे अपेक्षित नाही असे अनेकांचे म्हणणे होते. आताही त्यांना त्याच पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे.

या ‘दिमाग मे भूसा’ या गाण्यातील शब्दही अतिशय सुमार दर्जाचे असून ते पिळगांवकर यांच्यासारख्या कलाकाराने गावे का असे काहींचे म्हणणे आहे. युट्यूबवर हे गाणे अपलोड झाल्यापासून असंख्य लोकांनी पिळगांवकर यांना खडे बोल सुनावले आहेत. हे गाणेही शेमारु कंपनीचे असून रफीक राजा आणि झाहूर अलम यांनी त्याला संगीत दिले आहे. मुंबई अँथमप्रमाणे हे गाणेही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्यावेळी पिळगांवकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली होती. आता यावेळीही ते अशाप्रकारे आपली भूमिका मांडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 6:37 pm

Web Title: dimag me bhusa sachin pilgaonkar song troll again
Next Stories
1 अमिताभ बच्चन, विराट कोहलीच्या पंगतीत सनी लिओनी
2 गणपतीसाठी महेश काळेंची स्वरसाधना
3 Bigg Boss 12 : श्रीसंतमुळे पहिला टास्क रद्द; शो सोडून जाण्याची दिली धमकी
Just Now!
X