बॉलिवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनीची रागिनी एमएमएस मालिकेतील पुढची सीरिज लवकरच प्रदर्शित येणार आहे. ‘राघिनी एमएमएस रिटर्न्स २’ या सीरिजचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सस्पेन्स, अॅक्शन, थ्रिलर सोबतच हॉरर आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तुफान व्हायरल झाला होता. तसेच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘राघिनी एमएमएस रिटर्न्स २’ या वेब सीरिजमध्ये सनी लिओनीसोबतच अभिनेता वरुण सूद, दिव्या अग्रवाल देखील झळकणार आहेत. या खऱ्याखऱ्या आयुष्यातील कपलची केमिस्ट्री सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर सीरिजमधील दिव्या आणि वरुणच्या इंटीमेट सीनची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दोघांनीही त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
आणखी वाचा : इंटीमेट सीन करताना कशी होते अवस्था, अभिनेत्यानंच केला खुलासा
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुण आणि दिव्याला इंटीमेन सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर दिव्याने ‘माझ्यासाठी इंटीमेट सीन शूट करणं सोपं नव्हतं. पण मला असं वाटतय प्रेक्षकांना माझी आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला आवडेल’ असे म्हणाली.
आणखी वाचा : इंटीमेट सीन देण्यासाठी मला मुलीनेच प्रोत्साहन दिलं
‘जेव्हा मला दिव्यासोबत इंटीमेट सीन देण्यास सांगितले तेव्हा माझी काहीच हरकत नव्हती. हा इंटीमेट सीन योग्य प्रकारे कोरियोग्राफ करण्यात आला होता आणि निर्मात्यांनी तो योग्य प्रकारे सीरिजमध्ये दाखवला आहे’ असे वरुण म्हणाला.
‘राघिनी एमएमएस रिटर्न्स २’ ही वेब सीरिज येत्या १८ डिसेंबरला ऑल्ट बालाजी आणि झी५ वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये सनी लिओनीने एका गाण्यावर नृत्य देखील केले आहे.