News Flash

डार्लिंग डीन आणि डॉक्टर डॉन जाणार समुद्रापार अलिबागला

बोटीच्या प्रवासात मोनिकाची उडाली धांदल

डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. डॉन म्हटल्यावर गंभीर व क्रूर प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण हा डॉन फारच इमोशनल आहे. विनोदी पद्धतीने एका डॉनचं आयुष्य या मालिकेतून मांडण्यात आले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे मालिकेची रंगत अधिक वाढली आहे.

देवदत्त आणि श्वेता या दोन्ही मुख्य कलाकारांच्या अभिनयाची आणखी एक खास झलक लवकरच पाहायला मिळणार आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन, थेट अलिबागला निघाले आहेत. रस्त्यावर ट्रॅफिक असल्याने डॉनने समुद्रमार्गे अलिबाग गाठण्याचे ठरवले आहे. यात मोठी गंमत आहे, ती म्हणजे मोनिका… अर्थात, डॉनच्या डार्लिंगला समुद्राची वाटणारी भीती! मोनिकाला अलिबागला जायचे तर आहेच, पण समुद्रातून जाणं तिला फारसं आवडत नाहीये. डॉन आणि डीनचा रोमान्स, बोटीच्या प्रवासात मोनिकाची उडणारी धांदल आणि त्यातून होणारा गोंधळ मालिकेत पाहायला मिळणार आहे. बोटीचा हा प्रवास एकदा पूर्ण झाला, की त्याची डार्लिंग नेहमी बोटीनेच प्रवास करेल याची डॉनला शंभर टक्के खात्री आहे. मोनिकाच्या मनातील समुद्राची भीती मात्र काही केल्या कमी होत नसल्याने, हा संपूर्ण प्रवास मजेदार ठरणार आहे.

आणखी वाचा : इथून झाली प्रेमाची सुरुवात…अलका कुबल यांनी पोस्ट केला पतीसोबतचा सुंदर फोटो 

‘या दोघांचा अलिबागपर्यंतचा प्रवास पूर्ण होणार का?’, ‘या प्रवासात नेमकं काय काय घडणार?’, ‘डीनची समुद्राची भीती कमी होणार का?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘डॉक्टर डॉन’च्या पुढील भागात मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 3:27 pm

Web Title: doctor don and darling dean to go alibaug ssv 92
Next Stories
1 इथून झाली प्रेमाची सुरुवात…अलका कुबल यांनी पोस्ट केला पतीसोबतचा सुंदर फोटो
2 दिशाच्या ड्रेसवर टायगरच्या बहिणीची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाली…
3 ..म्हणून ‘या’ मराठी अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिलं ‘करोना’ औषध