06 March 2021

News Flash

सुपरहिरो चाहत्यांचा घेतला धसका; पिस्तुल घेऊन झोपतो ‘हा’ दिग्दर्शक

चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे चाहत्यांनी दिली मारुन टाकण्याची धमकी

मार्व्हल फॅन्समुळे मी स्वत: जवळ पिस्तुल घेऊन झोपावं लागतं. असा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जॉश ट्रँक याने केला आहे. मार्व्हल कंपनी सुपरहिरो चित्रपटांच्या क्षेत्रातील सर्वात आघाडिची कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या १० वर्षात या कंपनीने मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स या बॅनरखाली ‘आर्यनमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘थॉर राग्नारॉक’, ‘अॅव्हेंजर्स’ अशा जवळपास २४ सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाने तर कमाईच्या बाबतीत इतिहासच रचला. परंतु या दरम्यान त्यांची ‘फॅन्टॅस्टिक फोर’ ही चित्रपट सीरिज मात्र सुपरफ्लॉप ठरली. याचा संपूर्ण दोष मार्व्हल चाहत्यांनी दिग्दर्शक जॉश ट्रँकला दिला आहे. त्यासाठी त्याला थेट मारुन टाकण्याची धमकीही देण्यात आली होती.

सर्वाधिक वाचकपसंती – “बॉलिवूडमध्ये कोणीही जबरदस्ती करत नाही”; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

पायथॉन या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जॉशने हा धक्कादायक अनुभव सांगितला. ‘फॅन्टॅस्टिक फोर’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे मार्व्हल युनिव्हर्सला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. अर्थात हा प्रकार काही चाहत्यांना आवडला नाही. परिणामी त्यांनी याचा दोष जॉश ट्रँकला दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे चाहते केवळ टीका करुन शांत राहिले नाही तर त्यांनी जॉशला थेट मारुन टाकण्याची धमकी दिली.

सर्वाधिक वाचकपसंती – वरुणमुळे इस्रायलला मिळाली करोनाशी लढण्याची प्रेरणा; ‘हा’ डायलॉग ठरला कारणीभूत

“मार्व्हलने मला ‘फॅन्टॅस्टिक फोर’चे दिग्दर्शन करण्याची संधी दिली होती. परंतु माझा हा प्रयोग पूर्णपणे फसला. चित्रपट सुपरफ्लॉप झाला. परंतु मार्व्हल चाहत्यांनी याचा संपूर्ण दोष माझ्यावरच टाकला. काही चाहते तर थेट माझ्या घरात देखील घुसले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर पिस्तुल ठेवून जिवानीशी मारण्याची धमकी मला दिली होती. त्यानंतर मी पोलीस तक्रार केली. परंतु त्या घटनेमुळे मला आजही झोप लागत नाही. झोपताना मी स्वत:जवळ पिस्तुल घेऊन झोपतो.” असं जॉश या मुलाखतीत म्हणाला. या चित्रपटानंतर गेल्या पाच वर्षात जॉशने एकाही नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 6:14 pm

Web Title: fantastic four director started sleeping with a gun after getting death threats from marvel fans mppg 94
Next Stories
1 नेहा कक्करने केला नवा विक्रम, जगभरातील गायिकांना टाकले मागे
2 प्रवीण तरडेचा ‘बॉलिवूड पॅटर्न’; सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन
3 वरुणमुळे इस्रायलला मिळाली करोनाशी लढण्याची प्रेरणा; ‘हा’ डायलॉग ठरला कारणीभूत
Just Now!
X