बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. कोरिओग्राफ टेरेन्स लुईस आणि गीता कपूरसुद्धा यावेळी उपस्थित होते. या शोमध्ये गणेश आचार्य यांनी तब्बल ९८ किलो वजन कमी केल्याचं सांगितलं. या एपिसोडचा रंजक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या प्रोमो व्हिडीओमध्ये कपिल शर्मा त्यांना त्यांच्या वजनाविषयी प्रश्न विचारतो. त्यावर जवळपास १०० किलो वजन कमी केल्याचं गणेश आचार्य यांनी सांगितलं. हे ऐकून कपिल मस्करीत म्हणतो, “छोटे छोटे शहरों मे ४६-४६ किलो के आदमी होते है. दो आदमी गायब कर दिये आपने (छोट्या शहरांमध्ये ४६-४६ किलो वजनाचे लोक असतात. तुम्ही तर दोन माणसांना गायब केलात)”. हे ऐकून सेटवर एकच हशा पिकतो.
View this post on Instagram
आणखी वाचा : प्रकाशझोतापासून दूर राहणाऱ्या जेठालालच्या रिअल लाइफ पत्नीबद्दल जाणून घ्या..
वजन कमी करण्याविषयी गणेश आचार्य यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “माझ्यासाठी हे फार कठीण होतं. जवळपास दीड वर्ष मी माझ्या शरीरावर मेहनत घेतली. माझ्या स्वत:च्या चित्रपटासाठी मी ३० ते ४० किलो वजन वाढवलं होतं. त्यानंतर माझं एकूण वजन २०० किलोच्या आसपास गेलं होतं. काहीही करून हे वजन कमी करण्याचा निर्धार मी केला. लोकांनी गणेश आचार्यला जाड असल्याचंच पाहिलंय. मला माझी प्रतिमा बदलायची होती.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 11:39 am