News Flash

20 वर्षांची असतानाच गौहर खानचा ‘या’ दिग्दर्शकासोबत झाला होता साखरपुडा!

१८ व्या वर्षी केली करिअरला सुरूवात.

मॉडल आणि अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गेल्या वर्षी गौहर खान गायक जैद दरबारसोबत विवाह बंधनात अडकली आहे. मात्र गौहर तिच्या रिलेशनशिपमुळेही बऱ्याचदा चर्चेत आलीय. जैद आधी गौहर अभिनेता कुशाल टंडनला डेट करत होती. दोघांच्याही अफेअरच्या चर्चा त्यावेळी चांगल्याचं रंगल्या होत्या. मात्र कुशलला डेट करण्यापूर्वा गौहर बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत होती. तेही ती अवघ्या २० वर्षांची असताना.

18 वर्षांची असताना गौहर खानने मॉडलिंगला सुरुवात केली. कुशल टंडनला डेट करण्याआधी गौहर खान दिग्दर्शक साजिद खानच्या अफेरच्या मीडियामध्ये चर्चा होत्या. एवढचं नाही तर 2003 सालात दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या पसरु लागल्या होत्या. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. 18 वर्षांपूर्वी गौहर आणि साजिद एका सिरीयस रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला होता. दोघांनी अगदी गुपचूप साखरपुडा उरकला होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र दोघांनी त्याच्या नात्याचा उघडपणे खुलासा केला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत साजिद खानने गौहरचा नाव न घेता 2003 मध्ये आपला एका अशा मुलीशी साखरपुडा झाला होता जी आता लोकप्रिय आहे असं म्हंटलं होतं. तसतं तो म्हणाला, “मी तेव्हा इतका वाईट व्यक्ती नव्हतो. मी तिला फसवलं नाही. कदाचित ती मला कंटाळली असेल.” असं साजिद म्हणाला होता. याचवेळी मला फारसं बाहेर फिरणं किंवा पार्टी करणं आवडतं नसल्याचही तो म्हणाला होता. गौहर खान साजिदपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajid Khan (@aslisajidkhan)

गौहर खानने २००९ सालात आलेल्या ‘रॉकेट सिंह: सेल्समन ऑफ द ईयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये ती ‘ गेम’ या सिनेमात झळकली. त्याचसोबत इशकजादेमध्ये ती झळकली. २००७ मध्ये गौहरने बिग बॉसच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. याचवेळी अभिनेता कुशल टंडनसोबत तिचं नाव जोडलं गेल. मात्र कुशलसोबत लवकरच तिचं ब्रेकअप झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 3:10 pm

Web Title: gauahar khan get engaged with director sajid khan when she was 20 kpw 89
Next Stories
1 बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी केली मोठी मदत ; करोना रूग्णांसाठी पुरवले ऑक्सिजन मशीन्स
2 त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता
3 अभिनव आणि श्वेता तिवारीच्या भांडणावर पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया, म्हणाला..
Just Now!
X