News Flash

सुष्मिता सेननं दिली गोड बातमी; शेअर केली भली मोठी स्पेशल पोस्ट

सुष्मिताच्या वाढदिवशीच होणार बाळाचा जन्म ?

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिलीय. लवकरच तिच्या घरात एका नव्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सुष्मिता सेन लवकरच आत्या बनणार आहे. सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारू असोपा हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. घरी येणाऱ्या नव्या पाहूण्यासाठी उत्सुक असलेल्या सुष्मिता सेननं सोशल मीडियावर पोस्ट लिहून हा आनंद व्यक्त केला.

सुष्मिता सेननं नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून घरी येणाऱ्या नव्या बाळाला कुशीत घेण्यासाठी ती किती उत्सुक आहे, हे सांगितलं. यात तिने तिच्या भावाची पत्नी अभिनेत्री चारू असोपाने शेअर केलेली पोस्ट जोडली आहे. चारूने बेबी बम्पसह हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत सुष्मिताने लिहिलं, “ही बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप आतुर होती…मी आत्या बनणार आहे…माझा भाऊ राजीव आणि चारू असोपा यांच्या पॅरेंटहूड जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव आणि त्याची पत्नी चारू आसोपा हे लग्नाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. सुष्मिता सेनच्या घरी आलेली ही गोड बातमी आणखी आनंद द्विगुणीत करणारी ठरणार आहे. कारण अभिनेत्री चारूने नुकतीच तिची डिलीव्हरी डेट देखील शेअर केली आहे. नणंद सुष्मिता सेनच्या वाढदिवशीची ही डिलीव्हरी डेट असल्यानं कदाचित सुष्मिता सेनच्या वाढदिवशीच या नव्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. त्यामूळे आधीच आत्या बनणार असल्याच्या आनंदाने फुललेली सुष्मिता सेनने डिलीव्हरी डेट बद्दल देखील आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. सुष्मिता पुढे म्हणाली, “ते दोघेही येत्या नोव्हेंबरमध्ये नव्या पाहूण्याला या जगात आणणार आहेत…कदाचित माझ्या वाढदिवशीच…एक चांगल्या नशिबाची कमाल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

यापुढे सुष्मिता सेन म्हणाली, “या नव्या पाहूण्याला कुशीत घेण्यासाठी मी आणखी वाट नाही पाहू शकत…चारूने ही यासाठी खूप वाट पाहिली आहे आणि लहान मुलांप्रती तिला असलेली ओढ पाहता ती एक उत्तम आई होणार याची मला खात्री आहे…सेन आणि असोपा कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा…तुमच्या सगळ्यांवर मी खूप प्रेम करते.”

सुष्मिता सेनने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडून शुभेच्छा देत आहेत. ती आत्या बनणार असल्यानं तिचे चाहते तिचं अभिनंदन करताना दिसून येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:11 pm

Web Title: going to be a bua sushmita sens adorable post for pregnant sister in law charu asopa prp 93
Next Stories
1 जान कुमार सानूने शेअर केले बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो; म्हणाला, “धन्यवाद एजाज खान, मला त्रास दिल्याबद्दल!”
2 डॉ. अजित कुमार देव आणि डिंपलची लगीनघाई
3 पलक तिवारीने डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X