बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून बिग बी या चित्रपटाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यातच त्यांनी आता कलाविश्वातील सेलिब्रिटींना एक चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे चॅलेंज अनेक कलाकारांनी स्वीकारलं असून त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
‘गुलाबो-सिताबो’मध्ये बिग बी आणि आयुषमान खुराना हे दोघं घरमालक आणि भाडेकरु यांची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातच बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कलाकारांना चॅलेंज दिलं आहे.
बिग बींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. हा डायलॉग मजेशीर अंदाज असून तो न थांबता सलग पाच वेळा बोलण्याचं चॅलेंज त्यांनी दिलं आहे. “गुलाबो की खटर-पटर से तितर-बितर सिताबो, सिताबो के अगर-मगर से उथल-पुथल गुलाबो”, असा हा डायलॉग आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बिग बींनी दिलेलं हे चॅलेंज अभिनेता कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, आयुषमान खुराना या कलाकारांनी स्वीकारलं असून त्यांनी त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.विशेष म्हणजे बिग बींच हे चॅलेंज लोकप्रिय ठरताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ चार लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. बिग बी आणि आयुषमानचा ‘गुलाबो सिताबो’ १२ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.