News Flash

..म्हणून हिना खान ‘कसौटी जिंदगी की २’ मालिका अचानक सोडणार

मार्चनंतर हिना या मालिकेत दिसणार नाही. जाणून घ्या कारण..

हिना खान

काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा अनुरागच्या जोडीबरोबरच कोमोलिका ही खलनायिकाही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. आता ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अभिनेत्री हिना खान कोमोलिकाची भूमिका उत्तमरित्या साकारत आहे. प्रेक्षकांना तिची भूमिका आवडू लागली असतानाच ती आता मालिका सोडणार असल्याचं कळतंय.

मालिकेत हिनाच्या एण्ट्रीनंतर कथानकात बरेच ट्विस्ट आले. ‘आदर्श सून’ अशी ओळख असलेल्या हिनाने खलनायिकेचीही भूमिका तितक्याच ताकदीने साकारली. इतकंच नव्हे तर मालिकेच्या संपूर्ण टीममध्ये हिनालाच सर्वाधिक मानधन मिळत होतं. पण आता काही कारणास्तव ती ही मालिका मध्येच सोडणार आहे. मार्चनंतर हिना या मालिकेत दिसणार नाही.

चित्रपटांमधील कामामुळे मालिका अचानक सोडावं लागत असल्याचं हिनाने म्हटलं आहे. कोमोलिकासाठी मालिकेच्या निर्मात्यांना हिना खानच हवी आहे, परंतु अपुऱ्या वेळेअभावी तिला मालिका सोडावी लागत असल्याचं समजतंय. त्यामुळे आता हिनानंतर कोमोलिकाच्या भूमिकेत कोण झळकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या अकराव्या पर्वातही ती झळकली. आता ती हुसैन खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. रुपेरी पडद्यावर हिनाला पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 6:36 pm

Web Title: hina khan to take a break from kasautii zindagii kay 2 know the reason
Next Stories
1 प्रियंका-निकचा बेडरुममधील ‘तो’ फोटो काढणारा कोण?, नेटकरी झाले सैराट
2 अक्षय कुमारला भेटण्यासाठी चाहता बंगल्यात घुसला आणि….
3 नक्की चुकतंय कोण? पालक की मुलं?
Just Now!
X