News Flash

मी सावळी असल्याचा मला मनस्वी आनंद : चित्रांगदा

अभिनेत्री चित्रांगदा सिंगने केली पोस्ट

मी सावळी आहे आणि मी सावळी असल्यचा मला आनंद आहे असं अभिनेत्री चित्रांगदा सिंगने म्हटलं आहे. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना हिने सावळ्या रंगावरुन आपल्याला कसं चिडवलं जायचं याबाबत एक इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये मी १२ वर्षांची होईपर्यंत मला माझ्या रंगावरुन चिडवलं जायचं असं सुहानाने म्हटलं आहे. माझ्या सावळ्या रंगामुळे मला कुरुप ठरवलं जायचं असंही सुहानाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुहानाच्या पोस्टच्या दुसऱ्या दिवशीच चित्रांगदाने मी सावळी आहे आणि याचा मला मनस्वी आनंद आहे अशी पोस्ट लिहिली आहे.

Am Brown n Happy असं म्हणत चित्रांगदाने स्वतःचे चार फोटो पोस्ट केले आहेत.

२०१८ मध्ये आलेल्या बाझार या सिनेमात चित्रांगदाची महत्त्वाची भूमिका होती. तसेच सध्या ती बॉब बिश्वास या सिनेमाचं शूटिंगही करत होती. मात्र करोनामुळे हे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. बॉब बिश्वास या सिनेमात अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत आहे. हा एक सस्पेन्स थ्रीलर सिनेमा आहे. दिया घोष ही हा सिनेमा दिग्दर्शित करते आहे. मात्र करोनामुळे हे शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

हजारो ख्वाहिशे ऐसी या सिनेमाद्वारे चित्रांगदाने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एक वेगळ्या धाटणीची अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. अनेक वास्तवदर्शी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना हिने जेव्हा तिला तिच्या रंगावरुन कसं चिडवलं जायचं हे सांगितलं तेव्हा त्याला उत्तर देणारी पोस्ट आता चित्रांगदाने केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 1:42 pm

Web Title: i am brown and happy says chitangda sing via her insta post scj 81
Next Stories
1 “तुम्ही मास्क वापरणारच नव्हता ना?”; करोना पॉझिटिव्ह ट्रम्प यांची अभिनेत्रीने उडवली खिल्ली
2 कमबॅकसाठी जेनेलिया तयार; ‘ही’ भूमिका करण्याची इच्छा
3 VIDEO: महात्मा गांधींचं आवडतं भजन गाऊन लता मंगेशकर यांनी केलं अभिवादन
Just Now!
X