26 November 2020

News Flash

करोनामुक्त झाल्यावर ‘कसौटी जिंदगी की २’फेम अभिनेत्याला पॅनिक अटॅक

पार्थने शेअर केला अनुभव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये अनुराग बासुची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला करोनाची लागण झाल्याचं काही दिवसापूर्वी त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. परंतु, आता पार्थची करोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्याने त्या काळातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला पॅनिक अटॅक आल्याचं त्याने म्हटलं आहे.

पार्थला करोना झाल्याची माहिती त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर आता तो करोनामुक्त झाल्याचंही त्याने चाहत्यांना सांगितलं आहे. तसंच त्याला पॅनिक अटॅक आल्याचंही त्याने सांगितलं.

“हो माझा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि आता मी १७ दिवसांपासून होम क्वारंटाइन आहे. तसं पाहायला गेलं तर नियमानुसार, १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस. मला रात्री पॅनिक अटॅक आला होता. परंतु, आता मी पुण्यात माझ्या कुटुंबीयांसोबत आहे”, असं पार्थने सांगितलं.

दरम्यान, पार्थ समथान हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘प्यार तूने क्या किया’, ‘कसौटी जिंदगी के’, ‘ये है आशिकी’, ‘कैसी ये यारियां 3’ आणि ‘कहने को हम सफर हैं 2’ या मालिकांमध्ये झळकला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 11:13 am

Web Title: i had a panic attack says tv actor parth samthaan ssj 93
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे प्रयत्न सुरू
2 ‘जलता है वह खुद बुझ जाता है’; बिग बींची खास पोस्ट
3 ‘डिप्रेशनचा व्यवसाय चालवणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे’; कंगनाचा दीपिकावर निशाणा
Just Now!
X