आगामी चित्रपट डी डेमध्ये दिसणारा अभिनेता इरफान खान याला प्रथम निखिल अडवाणीच्या क्षमतेविषयी शंका होती. इरफान म्हणाला, मी त्याच्या पटकथेने प्रभावित झालो होतो. तो पटकथेप्रमाणेच काम करेल अथवा चित्रपट निर्मितीच्या वेळी त्यात काही बदल करेल, हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करत होतो. कित्येक वेळेस चित्रपटाची कथा सांगतांना व्यक्तिरेखेची पूर्ण माहिती दिली जात नाही. या गोष्टीला घेऊन मी थोडा चिंतित होतो. निखिलने जे लिहिले आहे त्याचप्रमाणे तो चित्रपट बनवेल याची मला खात्री नव्हती.
जेव्हा निखिल या चित्रपटासाठी एक्शन दिग्दर्शक थामस स्ट्रथर्स आणि स्टंट सह-समन्वयक जान स्ट्रीटला घेऊन आला, त्याच क्षणी चित्रपटाविषयीच्या सर्व शंका दूर होऊन निखिल फसवत नसल्याची खात्री पटल्याचे इमरानने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 8:00 am