छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिता, पोपटलाल, डॉ. हाती ही सर्व पात्र कायमच चर्चेत असतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत दिसत नाही. तिला पुन्हा मालिकेत कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण सध्या सोशल मीडियावर दिशाने मालिकेचे चित्रीकरण सुरु केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दिशा वकानी नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार आहे आणि तिने मालिकेचे चित्रीकरण सुरु केले आहे असे म्हटले आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही लोकांनी दिशाला सुनावले आहे. एका यूजरने ‘तू किती दिवस लोकांच्या भावनांशी खेळणार आहेस’ असे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दया बेन ही माहेरी गेली असल्याचे दाखवण्यात आले होते. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये दया बेन लवकरच येणार असल्याची हिंट देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिशाची पुन्हा एण्ट्री होणार या चर्चांना उधाण आले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.