News Flash

…म्हणून विमानतळावर लिसा हेडन आणि जॅकलीनमध्ये जुंपली

वाचा, नेमकं का झालं लिसा आणि जॅकलीनचं भांडण

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिचे हे फोटो, व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल होतात. यातच सध्या जॅकलीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात विमानात बसण्यावरुनरोखत आहे तिच्या आणि अभिनेत्री लीसा हेडनमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकलीन आणि लिसा मस्ती करत आहेत. यात दोघीही विमानात आधी कोण बसणार यावरुन वाद घालतांना दिसत आहे. विशेष म्हणजे कधी जॅकलीन लिसाला विमानात बसण्यापासून अडवत आहे. तर, कधी लिसा जॅकलीनला अडवत आहे. या दोघींचा व्हिडीओ सध्या लोकप्रिय होत असून ‘फिल्मी कीडा 123’ यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. जॅकलीन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘अलादिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 9:32 am

Web Title: jacqueline fernandez and lisa haydon fight for climb the plane first throwback video viral ssj 93
टॅग : Jacqueline Fernandez
Next Stories
1 सारा अली खानच्या कारचालकाला करोनाची लागण
2 बिग बींसाठी केलेल्या ट्विटमध्ये जूहीने लिहिले ‘आयुर्वेद’, ट्रोल झाल्यावर दिले स्पष्टीकरण
3 आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य
Just Now!
X