अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी हे जोडपं अभिनेत्री जया बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ऐश्वर्याची तोंड भरुन स्तुती करताना दिसत आहेत. त्यांना ऐश्वर्याचा कुठला गुण सर्वाधिक आवडला होता ज्यामुळे त्यांनी लग्नास होकार दिला, याबाबत त्या सांगताना दिसत आहेत.
ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे. ऐश्वर्याचे हे गुण जया बच्चन यांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे त्यांनी अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नास होकार दिला होता.
सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा थ्रोबॅक व्हिडीओ ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्याही आधिचा आहे. त्यावेळी अभिषेकच्या लग्नाची चर्चा होती. परंतु बच्चन कुटुंबियांचा त्यांच्या लग्नास नकार होता असे म्हटले जात होते. या पार्श्वभूमीवर ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जौहरने जया बच्चन यांना ऐश्वर्या संबंधीत प्रश्न विचारला. या प्रश्नावर जया यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिले होते.