News Flash

जॉनी लिव्हरची लेक गेल्या आठ वर्षांपासून करते करिअरमध्ये संघर्ष, केला मुलाखतीमध्ये खुलासा

जॅमी लिव्हर रानी मुखर्जी, सोनम कपूर, करीना कपूर, हेमा मालिनी यांची हुबेहुब मिमिक्री करते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

(Photo credit : Jamie Lever Instgram)

बॉलिवूड आणि घराणेशाही हा वाद कधी न थांबणार आहे. सेलिब्रिटींच्या मुलांना या क्षेत्रात कोणते ही स्ट्रगल न करता एण्ट्री मिळते. यावरून नेहमीच टीका केली जाते. परंतु काही आहेत जे याला अपवाद आहेत. लोकप्रिय विनोदवीर अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर आहे. गेल्या ८ वर्षांपासून जॅमीचा हा संघर्ष सुरूच आहे. तिच्या या संघर्षाबद्दल जॅमीने एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

जॅमीला आजही लोकप्रिय विनोदवीर अभिनेते जॉनी लिव्हरची मुलगी म्हणून ओळखले जाते. अभिनय क्षेत्रात तिला स्वत: ची ओळख निर्माण करायची आहे म्हणून ती गेल्या ८ वर्षांपासून काम शोधत आहे. “मला अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करायचे आहे. ते ही स्वतःच्या बळावर करायचे आहे. त्यामुळे मी आतापर्यंत वडिलांची मदत घेतलेली नाही अथवा त्यांनी देखील माझी शिफारस कोणाकडे केलेली नाही अथवा शिफारसीसाठी फोनही केलेला नाही. त्यांनी असे काही करावे असे मी कधीही त्यांना सुचवले देखील नाही,” असे जॅमी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

वडील जॉनी लिव्हर यांच्याबद्दल बोलताना जॅमी पुढे म्हणाली, “भारतातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर अभिनेत्यांपैकी एक माझे वडील जॉनी लिव्हर यांचे नाव घेतले जाते. साडेतीन दशके ते मनोरंजन विश्वामध्ये काम करत आहेत. आतापर्यंत १३ वेळा त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले आहे. एक काळ असा होता की, प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर हवेच होते. अशा ख्यातनाम वडिलांची मुलगी असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

तिच्या कामाविषयी बोलताना जॅमी म्हणाली, “मला या गोष्टीचा आनंद आहे की मला जी काही कामं मिळाली ती माझ्या हिंमतीवर आणि माझ्या गुणांमुळे मला मिळाली. कुणी माझी शिफारस केली म्हणून ती कामे मला मिळाली नाहीत.”

आणखी वाचा : “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…,”करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी

जेमी लिवरने २०१२ मध्ये लंडनस्थित मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्सिक्युटिव म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ती मुंबईतील ‘द कॉमिडी स्टोरी’मध्ये स्टँड अप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि ‘किस किसको प्या करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या सिनेमांमध्ये तिने काम केले. जेमी मिमिक्री करण्यात माहिर आहे. तिने रानी मुखर्जी, सोनम कपूर, करीना कपूर, हेमा मालिनी यांची हुबेहुब नक्कल करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 6:53 pm

Web Title: johnny lever daughter jamie lever struggle since 8 years and not getting work dcp 98
Next Stories
1 फॅन्सच्या विचित्र मागण्यांमुळे त्रस्त द ग्रेट खलीनं उचचलं हे पाऊल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
2 ‘प्राजक्ता माळी इतनी क्यूट कैसे है?’, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
3 “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…”,करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी
Just Now!
X