14 October 2019

News Flash

‘जोकर’चा जबरदस्त परफॉर्मन्स; अवघ्या आठ दिवसांत कमावले इतके हजार कोटी रुपये

भारतातही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

‘जोकर’ हा सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या व्यक्तिरेखेवर आधारित तयार केला गेलेला जोकर हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोन ऑक्टोंबरला प्रदर्शित झालेल्या जोकरने पहिल्या आठ दिवसात जगभरातून तब्बल २ हजार १०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.

भारतातही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जोकर प्रदर्शित झाला त्याच वेळी हृतिक रोशन व टायगरची श्रॉफ यांचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे जोकरला मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची संधी मिळाली. परंतु त्याही परिस्थीत वॉरला चांगलीच टक्कर देत भारतातही या चित्रपटाने ३२.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकरला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. खलनायक रुपात झळकलेल्या जोकरला या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानीत केले गेले होते. तेव्हा पासून चाहत्यांनी जोकरवरील एका स्टँड अलोन चित्रपटाची मागणी करण्यास सुरुवात केली होती. परिणामी चाहत्यांच्या आग्रहाखातर या चित्रपटाची निर्मिती केली गेली.

First Published on October 10, 2019 5:07 pm

Web Title: joker box office collection mppg 94