News Flash

सलमानवर ट्विट करणं अभिनेत्याला पडलं महाग; येतायत पाकिस्तानमधून धमक्या

सलमानवर टीका केल्यामुळे पाकिस्तानी चाहते संतापले

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीचं निमित्त साधून सलमान खानवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामुळे त्याला चक्क पाकिस्तानातून धमक्या येत आहेत.

“मी सलमानबाबत काहीही ट्विट केलं तरी पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून मला धमक्या दिल्या जातात. हे चूकीचं आहे. मी सलमानवर टीका करत आहे, तुमच्या देशावर नव्हे. जर तुम्हाला तो आवडत असेल तर मला काही फरक पडत नाही. त्याला तुमच्या चित्रपटांमध्ये काम करायला सांगा.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याला पाकिस्तानमधून धमक्या येत असल्याचा दावा त्याने केला आहे.

गेल्या काही काळात कमाल सातत्याने सलमानवर टीका करत आहे. “संपूर्ण जगाला माहिती आहे सलमानने विवेक, जॉन आणि अर्जित यांच्यासोबत काय केलं. आता सोनू निगम, साहिल खान आणि इतर कलाकार त्याच्यावर आरोप करत आहेत. हा निव्वळ योगायोग नाही. सलमानने नक्कीच यांच्यासोबत काही तरी केलं आहे. उगाचच कोणी त्याच्यावर आरोप करत नाही.” यापूर्वी त्याने अशा आशयाचे ट्विट करुन सलमानवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 6:15 pm

Web Title: kamaal r khan criticises on salman khan mppg 94 2
Next Stories
1 गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
2 इटलीतील पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी इतका खर्च झाला की…; कंगनाने सांगितला ‘तो’ किस्सा
3 सलमानला पाठिंबा दिल्याने सुनील ग्रोवर झाला ट्रोल, दिले अनोख्या अंदाजात उत्तर
Just Now!
X