बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरके सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सिनेमांच्या रिव्हूसोबतच तो बॉलिवूड आणि देशात घडणाऱ्या घडोमोडींवर त्याचं मत मांडत असतो. नुकताच केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

केआरकेने ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केलाय. एका ट्विटमध्ये तो म्हणालाय, ” पंतप्रधानांचं नवं घरं 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. या नव्या घराची किंमत जवळपास १३५०० कोटी असेल. आज सरकराने हा प्रोजेक्ट पुढे ढकलला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागतो तेव्हा हे घडतंय. कमाल आहे..पंतप्रधानांकडे तर लक्झरी घर असायलाच हवं.” असं खोचक ट्वीट केआरकेने केलंय.

तर पुढच्या ट्विटमध्ये कमाल आर खान म्हणालाय, ” सगळ्यांच्या हे लक्षात येणं गरजेचं आहे की ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आणि तुटवड्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय कोणतही राज्य सरकार ऑक्सिजनची आयात करू शकत नाही. त्यामुळे जर ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. तर त्याला केंद्र सरकरा जबाबदार आहे.” असं म्हणत केआरकेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचा : “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का?”, ‘त्या’ व्हिडीओ नंतर पायल रोहतगी ट्रोल

केआरकेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातील अनेकांनी तर त्याच्या मताचं समर्थन केलंय. एका युजरने म्हंटलंय, “स्टॉप पीएम हाउस प्रोजेक्ट. नोटबंदीच्या वेळी सरकारवे भरपूर पैसै वाया घालवले. त्यानंतर 3000 कोटी खर्च करून पटेलजींचा पुतळा उभारला आणि आता पंतप्रधानांचं घर बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहेत. ही आमच्या मेहनतीची कमाई आहे. आम्ही टॅक्स भरला आहे.” अशी संतप्त प्रतिक्रिया या युजरने दिलीय.

कमाल आर खान गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय असून देशातील विविध घडामोडींवर परखड मत व्यक्त करत आहे.