गिर्यारोहण हा चित्तथरारक अनुभव असतो. या अनुभवादरम्यान स्वत:च्या क्षमतेचा कयास तर लागतोच पण उत्साह आणि धाडस स्वत:मधील एका वेगळ्याच ऊर्जेची ओळख करून देतो. या ऊर्जेपासून प्रेरित होत अभिनेत्री कंगना रणौतने एक कविता लिहिली आहे. या कवितेचा व्हिडीओ तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘मेरी राख को गंगा मे मत बहाना’, असं या कवितेचे बोल असून नेटकऱ्यांकडून त्याला लाइक्स मिळत आहेत.

या व्हिडीओत कंगना पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर असलेल्या शिखरावर आनंदाने, उत्साहाने खेळताना, बागडताना दिसतेय. ‘गिर्यारोहण करताना प्रेरित होऊन राख ही कविता लिहिली आहे. शक्य असेल तेव्हा हा व्हिडीओ पाहा’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

कंगनाने लिहिलेली कविता-

‘मेरी राख को गंगा मे मत बहाना
हर नदी सागर मे जाकर मिलती है
मुझे सागर की गहराईंयों से डर लगता है
मै आसमान को छूना चाहती हूँ
मेरी राख को इन पहाडों पे बिखेर देना
जब सूरज उगे, तो मै उसे छू सकू
जब मे तनहा हू, तो चांद से बातें करूँ
मेरी राख को उस क्षितीज पे छोड देना’