News Flash

‘कंगनामुळे महाराष्ट्र व मुंबईचं नाव बदनाम होतंय’; अभिनेत्रीने केली टीका

अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता अभिनेत्री नगमानेदेखील संताप व्यक्त केला आहे. कंगनामुळे मुंबईचं आणि महाराष्ट्रचं नाव खराब होत आहे, असं ती म्हणाली आहे. नगमाने ट्विट करत आगपाखड केली आहे.

“कंगना रणौतमुळे महाराष्ट्र आणि मुंबई यांचं नाव बदनाम होत आहे. तसं पाहायला गेलं तर जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्यात ती अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. तसंच तिच्यामुळे बॉलिवूडचं नावसुद्धा खराब होत आहे. तिने प्रथम घराणेशाहीपासून सुरुवात केली आणि आता इनसायडर व आऊटसायडर असा वाद सुरु केला. त्यातच आता मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणत आहे”, असं ट्विट नगमाने केलं आहे.

आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट

आणखी वाचा- “ज्या हातांनी भरवलं ते हात कापायचे नसतात”; स्वरा भास्करचं कंगनाला प्रत्युत्तर

दरम्यान, नगमाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्यावर टीकादेखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:11 pm

Web Title: kangna is defaming maharashtra mumbai actress nagma ssj 93
Next Stories
1 बाहुबलीनं दत्तक घेतलं १६५० एकर जंगल
2 काम करण्यास नकार देणाऱ्या सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांना कंगनाचं उत्तर, म्हणाली…
3 Birthday Special : दुसऱ्या मुलासाठी ट्विंकलने अक्षयला घातली होती अट
Just Now!
X