29 September 2020

News Flash

‘फक्त कधी आणि कुठे ते सांग’; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये साराने तिची इच्छा बोलून दाखवली होती.

सारा अली खान, कार्तिक आर्यन

जेव्हापासून अभिनेत्री सारा अली खानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तेव्हापासून कार्तिकला प्रत्येक मुलाखतीत हाच प्रश्न विचारला गेला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकला अनन्या पांडेसोबत लंच डेटला गेल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याने साराला नकार दिला की काय अशी चर्चा होती. इतकंच काय तर आईने मला आता कार्तिकला मेसेज करू नकोस असंही दटावल्याचं साराने सांगितलं होतं. या सर्व गोष्टींनंतर अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार झाला आहे.

‘आता तू आणखी मागे नको लागूस असं साराच्या आईने तिला म्हटल्याचं मी वाचलं होतं. मी उत्तर देणं त्यांना अपेक्षित होतं आणि माझं उत्तर हेच आहे की मी सारासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी तयार आहे. तिने फक्त कधी आणि कुठे ते मला सांगावं,’ असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने तिची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर कार्तिककडून काही सकारात्मक उत्तर न आल्याने साराच्या आईने फार प्रयत्न न करण्यास सांगितले होते. अखेर कार्तिक साराची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला आहे.

सारा आणि कार्तिकची भेट घडवून आणण्यासाठी अभिनेता रणवीर सिंगनेही प्रयत्न केले होते. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीरने कार्तिकची साराशी भेट करून दिली होती. ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांनंतर कार्तिक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये साराचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 11:12 am

Web Title: kartik aaryan finally agrees to go on a coffee date with sara ali khan
Next Stories
1 तुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी
2 अँजेलिनाचे डोनाल्ड ट्रंपला आव्हान
3 शकीरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप
Just Now!
X