माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. कालच्या भागात एका स्पर्धकाला ८० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे खेळ सोडावा लागला. त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

सोमवारी कौन बनेगा करोडपती १२मध्ये हॉट सीटवर मध्य प्रदेशमधील गुजरखेड येथे राहणारे कौशलेंद्र सिंह तोमर बसले होते. त्यांनी शोच्या सुरुवातीलाच केबीसीमध्ये जिंकलेले पैसे गावात धरण बांधण्यासाठी वापरणार असल्याचे म्हटले होते. कौशलेंद्र यांनी शोमध्ये ४० हजार रुपये जिंकले. त्यांनी ४० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत सगळ्या लाइफलाइन वापरल्या. ८० हजार रुपयांच्या प्रश्नाला त्यांच्याकडे एकही लाइफलाइन शिल्लक नव्हती आणि या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

पाहा: ‘हे’ आहेत राजघराण्यातून आलेले बॉलिवूड कलाकार

८० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-

‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस, १८५७’ या पुस्तकाचे लेखक कोण होते?
A- विन्सटन चर्चिल
B- जवाहरलाल नेहरू
C- विनायक दामोदर सावरकर
D- रवींद्रनाथ टागोर

या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे कौशलेंद्र यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. गेम क्विट केल्यानंतर त्यांनी विन्सटन चर्चिल असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे उत्तर विनायक दामोदर सावरकर असे आहे.