अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक आरोप केले आहे. या आरोपांनंतर सुशांतच्या मित्रपरिवारानेदेखील रियाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यात सुशांतच्या मैत्रिणीने क्रिसन बॅरेटो (Krissann Barretto) हिने मौन सोडलं असून सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यामुळे सारं चित्र बदललं असं सांगितलं आहे.

“सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. सुशांत आणि आमचा संपर्क कमी झाला. रिया कधीच त्याला कोणत्या मित्र-मैत्रिणींसोबत जास्त बोलू देत नव्हती. त्याचा फोन नंबरदेखील सतत बदलत रहायचा. त्यामुळे त्याचं आणि आमचं बोलणं होत नव्हतं”, असं क्रिसन बॅरेटो म्हणाली.

 

View this post on Instagram

 

VJ Krissann is back @linkedin @mtvindia #getajob

A post shared by (@krissannb) on

पुढे ती म्हणते, “रियामुळे सुशांतमध्ये झालेले बदल आम्हाला दिसून येत होते. त्यामुळे आम्ही सतत त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायचो. त्याच्या वडिलांनी देखील सांगितलं की सुशांत आणि कुटुंबीयांचं बोलणं होत नव्हतं. सुशांतने आम्हाला मोठी स्वप्न पाहायला शिकवलं पण रिया आली आणि सगळंच बदललं. रिया चक्रवर्ती, सत्य एक ना एक दिवस नक्कीच उघड होईल”.

दरम्यान, क्रिसन ही सुशांतची जवळची आणि चांगली मैत्रीण होती. क्रिसन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ससुराल सिमर का, ये इश्क नहीं आसान या मालिकांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच वेळा ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.