News Flash

‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

केआरके कुत्ता है हे गाणं आज प्रदर्शित होणार आहे.

केआरके कुत्ता है हे गाणं आज प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कमाल आर खान सतत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर टीका करत आहे. आता केआरकेचं गायक मिका सिंगशी भांडण झालं आहे. खरतरं केआरकेचे सलमान सोबत झालेल्या भांडणानंतर मिकाने केआरकेवर निशाना साधला. दरम्यान, मिकाने एक व्हिडीओ शेअर करत तो केआरकेवर गाणं बनवतं आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाला आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम

मिकाने बुधवारी त्याच्या गाण्याच्या टिझर हा ट्वीट करत प्रदर्शित केला. या गाण्याचं नाव केआरके कुत्ता असं आहे. हा टिझर शेअर करत हे गाणं ११ जूनला प्रदर्शित होणार. मिकाच्या एका फॅन क्लबने ‘केआरके कुत्ता है’ या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “मित्रांनो हे गाणं कसं वाटलं,” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिकाला प्रत्युत्तर देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. “एवढा काय भुकतोस, पुढे येऊन गाणं प्रदर्शित करण्याची हिमत्त नाही? घाबरू नकोस, संकोच न करता कर! माझी इच्छा आहे की तू फक्त एकदा हे गाणं प्रदर्शित कर! मग बघ!,” असे ट्वीट करत केआरकेने मिकाला धमकी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

आणखी वाचा : जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…

हे गाणं आज प्रदर्शित होणार आहे. मिकाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ गाणं कशा पद्धतीने बनवल याचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 10:26 am

Web Title: krk s warning mika singh and says tu ek baar song release karde fir dekh dcp 98
Next Stories
1 चुलत बहिण शनाया कपूरला डेब्यूसाठी मदत करणार नाही अर्जुन कपूर
2 अनुष्का शर्माचा ‘थ्री इडियट्स’च्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल; व्हिडीओ पाहून आमिर खान थक्क
3 ‘खतरों के खिलाडी’मध्ये मोठा ट्विस्ट; एक नाही, दोन नाही तर पाच स्पर्धकांना शोमधून केलं आऊट
Just Now!
X