News Flash

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील शीतली ऊर्फ शिवानी बावकर करोना पॉझिटिव्ह

सध्या शिवानी होम क्वारंटाइन आहे...

करोनाच संकट पुन्हा एकदा आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींजवर देखील होतं आहे. अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकरला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

शिवानीने ट्वीट करतं ही माहिती दिली. ‘नमस्कार मित्रांनो! सर्व काळजी घेऊनही, दुर्देवाने माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेले सर्व प्रोटोकॉल फॉलो करत, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की आवश्यक खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. भेटू लवकरचं!,’ असे ट्वीट करत शिवानीने करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

शिवानी ही ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शीतलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेतील शीतलीचा अंदाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शीतली आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. कलाविश्वाप्रमाणे शिवानी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

दरम्यान, रुग्णाची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असली, तरी करोनाच्या रुग्णवाढीला अद्यापही अंकुश लागलेला नाही. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढच होत आहे. करोनाचा प्रसार कमी होण्यासाठी कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 4:23 pm

Web Title: lagir jhal ji fame shivani bavkar test corona positive dcp 98
Next Stories
1 आलिया-रणबीर जोडीने निघाले फिरायला; फोटो होत आहेत व्हायरल
2 अभिनेत्याला झाली माजी पंतप्रधानांची आठवण; म्हणाला, “आठवतंय जेव्हा मनमोहन सिंग यांनी…”
3 “मी संन्यास घेतला, टक्कल केलं…” ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अपघातानंतरचा हेलावून टाकणारा अनुभव
Just Now!
X