News Flash

हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे

अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज गाजली होती. भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

२ मिनिटे ४९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये ‘फॅमिली मॅन’ ऊर्फ श्रीकांत तिवारीची कथा दाखवण्यात आली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या या अॅक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक पाहायला मिळणार आहे.

पाहा : २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील ‘या’ आलिशान बंगल्यात

‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 10:09 am

Web Title: manoj bajpayee starrer the family man season 2 trailer and released date avb 95
Next Stories
1 ‘लग्न’ जास्त महत्वाचं ना की ‘समारंभ’, सोनाली कुलकर्णीच्या निर्णयाचं कौतुक
2 विमानतळावर रकुलच्या बॅगमध्ये पोलिसांना सापडली धोकादायक वस्तू; सांगितला किस्सा
3 निक्की तांबोळीने केपटाउनवरून शेअर केले बोल्ड फोटोज ; दिलखेचक अंदाज पाहून फॅन्स फिदा
Just Now!
X