News Flash

‘वाथी कमिंग’वर शशांकचा भन्नाट डान्स, पत्नी प्रियांका म्हणाली डान्स शिकण्याची गरज

‘पाहिले न मी तुला’ धमाल डान्स

अभिनेता शशांक केतकरने आजवर त्याच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. शशांक सध्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करतोय. या मालिकेत शशांकची भूमिका काहिशी वेगळी आहे. व्हिलनच्या भूमिकेत तो या मालिकेत दिसून येतोय.

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांकसोबत अभिनेता आशय कुलकर्णी आणि तन्वी मुंडले यांची जोडी पाहायला मिळतेय. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. नुकताच शशांकने या मालिकेच्या सेटवरील एक धमाल व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांनी शशांकच्या डान्सबद्दल चर्चा केल्याचं दिसतंय.

लंडनमध्येही होळी जोरात! ‘देसी गर्ल’ने पती आणि सासू-सासऱ्यांसोबत साजरी केली होळी

सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असलेल्या ‘वाथी कमिंग’ ट्रेंडमध्ये ‘पाहिले न मी तुला’चे तीनही कलाकार समाल झाले. रंगपंचमीच्या धमाल सेलिब्रेशनमध्ये शशांक, आशय आणि तन्वीने ‘वाथी कमिंग’वर ठेका धरल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. तिघांनी देखील हटके स्टाईलने डान्सची सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतर तिघांनी एकच कल्ला केला. यात शशांकने मालिकेतील व्हिलनच्या भूमिकेप्रमाणेच तन्वीला मजेत पळवून नेल्याचं पाहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

‘आरके’ स्टुडीयोमध्ये अशी साजरी व्हायची बॉलिवूड स्टाइल होळी, पाहा फोटो

शशांक उत्तम अभिनेता असला तरी डान्स करणं म्हणजे त्याच्यासाठी अवघड आहे. त्यामुळेच या व्हिडीओत शशांकला डान्स करताना पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर काहिंनी आश्चर्य व्यक्त केलंय. शशांकच्या या व्हिडीओला अभिनेता सुयश टिळकने “चक्क तू नाचतोयस” अशी कमेंट केली आहे. तर शशांकची पत्नी प्रियांकाच्या कमेंटनंतर या व्हिडीओवर बरीच चर्चा झाल्याचं दिसतंय.

“आणि होळी पार्टीत त्याने माझ्या… “; अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

शशांकची पत्नी प्रियांका हिने या व्हिडीओवर कमेंट दिली आहे. ती म्हणाली आहे. ” तूला खरचं त्या डान्सच्या धड्यांची गरज आहे. ज्याबद्दल आपण बोललो होतो शशा.” अशी कमेंट तिने दिली आहे. यावर अभिनेत्री अनुजा साठेने रिप्लाय दिलाय. “त्याची गरज आहे असं मला नाही वाटत प्रियांका.” असं अनुजा म्हणाली आहे. तर अभिनेता अभिजीत खांडकेकर म्हणाला आहे. “नाचू दे गं त्याला प्रियांका. ना रे तू बिंधास्त शशांक.” एकंदरच शशांकच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांच मनोरंजन झाल्याचं दिसून येतंय. चाहत्यांनी देखील या व्हिडीओला चांगलीच पसंती दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:41 pm

Web Title: marathi actor shashank ketkar dance on vaathi coming with ashya kulkarni goes viral kpw 89
Next Stories
1 मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, वहीदा रहमान यांचा खुलासा
2 खऱ्या पुरुषाने काय करायला हवं?; सनी लिओनी म्हणाली…
3 Holi 2021: ‘रंग बरसे’ ते ‘बलम पिचकारी’, रंगाची उधळण करताना बेभान करणारी गाणी
Just Now!
X