News Flash

“एकदा तरी स्वतः…” सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

सिद्धार्थ चांदेकरने दिला नेटकऱ्यांना सल्ला म्हणाला..

या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वतः साठीसुद्धा वेळ नाही. आपण स्वत:चा विचार करत नाही. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या अचानक निधनानंतर बरेच कलाकार मानसिक आरोग्य, स्वत:कडे लक्षं द्या, असा सल्ला देताना दिसले. काही दिवसांपूर्वी ‘कसौटी जिंदगी की’ मधील अभिनेता साहिल आनंद ही मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसला. या नंतर आता मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पण मानसिक आरोग्य आणि स्वतः कडे लक्ष देण्यास सांगताना दिसत आहे.

सिद्धार्थ चांदेकर तसा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. मात्र सिद्धार्थने  शेअर केलेल्या या पोस्टने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्ट मध्ये सिद्धार्थ एक महत्वाचा मेसेज देताना दिसत आहे.  ही पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांंना  सांगायचा प्रयत्न करत आहे की, एकदा तरी स्वतःला काय हव आहे ते बघा, तुमच्या मनातून आवाज येईल त्याला ऐकायचा प्रयत्न करा. अशा आशयाची मोठी पोस्ट सिद्धार्थने शेअर केली आहे. या पोस्ट खाली ‘एकदा तरी विचार करा’ अस कॅप्शन देखील दिले आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्ट खाली बऱ्याच नेटकऱ्यांंनी कमेंट केली आहे. एक युजर म्हणाला ” खरंच दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःला काय हवं आहे हे विसरूनच जातो आपण” अजून एक युजरने कमेंट केली की ” सुंदर अप्रतिम लेख सिद्धार्थ चांदेकर, हे मनोगत सांगितल्या बद्दल थॅंकयू.” सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंण्ड होताना दिसत आहे. तसेच या पोस्ट वर लाइक्स देखील मिळताना दिसले.

Sidhharth-chandekar-post

दरम्यान सिद्धार्थ चांदेकर स्टार प्रवाहावरील “सांग तू आहेस ना ?” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तसच सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:48 pm

Web Title: marathi actor siddharth chandekar shares mental health related post went viral aad 97
Next Stories
1 रसिका सुनीलचा बॉयफ्रेंडसोबतचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल
2 “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
3 श्वेता तिवारीचा फिटनेस मंत्र; मायलेकीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X