आजवर मराठी कलाविश्वात काही दिग्दर्शक, निर्माते यांनी नवनवीन विषय हाताळत नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्येच ‘संघर्ष यात्रा’, ‘शिव्या’ अशा उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले साकार राऊत पुन्हा एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांचा ‘अजुनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून परग्रहवासीयांची कथा उलगडली जाणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेता पियूष रानडे याची मुख्य भूमिका असलेल्या ‘अजुनी’ या आगामी चित्रपटाचं काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. त्यातच आता चित्रपटाच्या टीझरने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video

सायफाय कथानक असलेल्या ‘अजुनी’ या चित्रपटातून परग्रहवासीय व्यक्तीची प्रेमकथा उलगडली जाणार असल्याचं या टीझरमधून पाहायला मिळत आहे. साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा ‘अजुनी’ हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे.

दरम्यान,अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच साकार राऊत यांनी निर्मितीचीही जबाबदारीही स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटात पियूष रानडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीदेखील अद्याप अन्य भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आलेला नाही. त्यामुळे पियूषसोबत या चित्रपटात नेमकी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.