छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्यातच दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळण घेत असून आता डॉ. अजितकुमार आणि मंजुळा यांच्यात वैर निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मंजुळा गावात आली असून अजितकुमारला तिची भुरळ पडली आहे. मात्र, स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे मंजुळा सहजासहजी ती डॉक्टरांच्या जाळ्यात अडकत नाही. त्यात मंजुळा वारंवार डॉक्टरांचा अपमान करत असल्यामुळे तो संतापाने पेटून उठतो आणि तिच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा हा डाव मंजुळा हाणून पाडते.

Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
bahujan vikas aghadi, palghar, lok sabha election 2024, MLA hitendra thakur
पालघर मध्ये बविआ निवडणूक लढवणार, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

डॉक्टर मंजुळाच्या घरात शिरण्यास यशस्वी होतो.मात्र, त्याचवेळी ती डॉक्टरांना पकडते आणि हाताला धरुन त्याला घराच्याबाहेर खेचते. इतकंच नाही तर ती सगळ्या गावासमोर त्याचा पाणउतारा करते. विशेष म्हणजे आता गावासमोर देवमाणूस ही प्रतिमा असलेल्या अजितचा पाणउतारा झाल्यानंतर तो कोणतं पाऊल उचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अजित आता नेमकं काय करेल हे येत्या मंगळवारी म्हणजे १ डिसेंबरलाच कळणार आहे.