News Flash

Video : मिका सिंग देतोय ‘डोक्याला शॉट’

मिकाने हे गाणं मराठी गायलं आहे

मिका सिंग

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना आपला आवाज देणारा गायक मिका सिंगने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोक्याला शॉट या चित्रपटातील एका गाण्याला मिकाने त्याचा आवाज दिला असून हे गाणं प्रदर्शित झालं आहे. डोक्याला शॉट हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार असून हा धमाल कॉमेडी चित्रपट आहे. यापूर्वी या चित्रपटातील ‘जोरु का गुलाम’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर ‘डोक्याला शॉट’ असे बोल असलेलं टायटल सॉगदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘डोक्याला शॉट’ला मिकाचा भारदस्त आवाज लाभला असून अमितराज यांच्या संगीताची त्याला जोड मिळाली आहे. चित्रपटाची सुरुवातच धमाकेदार झाली पाहिजे त्यासाठी या चित्रपटाची सुरुवातच या गाण्याने होते.

या गाण्यातून चार मुलांची एकमेकांशी असलेली घट्ट मैत्री अगदी स्पष्ट दिसून येत आहे. शिवाय सुव्रत, रोहित, ओमकार हे तिघे गणेश पंडित या त्यांच्या चौथ्या मित्राला किती त्रास देतात, हे अनेक दृश्यातून दिसते. चहा टपरीवर चहा पिताना, अंड खाली ठेऊन त्यावर त्याला बसवतात, बॅटने त्याला मारतात इतका त्रास देऊन पण गणेश पंडित न चिडता खिलाडू वृत्तीने त्या सर्व मजा मस्तीचा आनंद घेतो.

‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 5:49 pm

Web Title: mika singh marathi movie dokyala shot song out
Next Stories
1 थिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’
2 ह.म.बने, तु.म.बने मध्ये मिळणार मुलांच्या सुरक्षिततेचे धडे
3 Trailer : इस ‘नोटबुक’ में हम हमेशा साथ रहेंगे!
Just Now!
X