News Flash

‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित होणार

चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये आधीपासूनचं उत्सुकता निर्माण केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते आज नागपूरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या ‘टी २० वर्ल्ड कप’च्या पहिल्या सामन्याअगोदर चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करणार आहेत. चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत नागपूरमध्ये दाखल झाला आहे. ‘इंडिया’ लिहिलेला जर्सी परिधान केलेल्या सुशांतने समाजमाध्यमावर आपले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. नेटमध्ये सरावादरम्यान आपण तीन तास नाबाद राहिल्याने आपले गुरू किरण मोरे यांनी त्यांचा हा जर्सी आपल्याला भेट दिल्याचे त्याने छायाचित्रासह लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये आधीपासूनचं उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटात सुशांत धोनीच्या प्रमुख भूमिकेत असून, किरण अडवाणी साक्षी धोनीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. या वर्षी २ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

My Guru #kiranMore gifted me his jersey after I was Notout for 3hrs in nets. @jockmore ❤️❤️ #DhoniTeaserOnStarSports

A photo posted by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 6:48 pm

Web Title: ms dhoni the untold story teaser out today sushant singh rajput nagpur
Next Stories
1 शाहरुख स्वतःचाच करतोय पाठलाग!
2 व्हायरलः रणवीरचे पहिले ऑडिशन पाहून तुम्हीही हसाल
3 आलिया-रणवीरचा ‘मिस्ट्री प्रोजेक्ट’
Just Now!
X