काजल मुगराई या दिल्ली स्थित पारलौकिक विद्यासंपन्न व्यावसायिक ‘निळकंठ’ या नव्या नेत्रदिपक ब्रॉडवेसह शंकर भगवानांचा जीवनपट उलगडून दाखवण्यास सज्ज झाल्या आहेत. भगवान शंकरांचे अद्वितीय, भव्य रूप सादर करताना अत्यंत परिणामकारक परफॉर्मन्सेस, कलाकार आणि गायकांच्या साथीने भारतातील सर्वांत लक्षवेधी आणि अद्वितीय ब्रॉडवे म्युझिकल तयार करण्याचे ध्येय काजल यांनी बाळगले आहे. त्यांच्या स्वतःच्या म्हाळसा मुव्ही अॅण्ड एण्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे या ब्रॉडवेची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी इशान सूद आणि अश्मित दिनो यांनी भागीदारीही केली आहे. या दोघांनीही प्रसारमाध्यमे व मनोरंजन क्षेत्रात अनेक दशके काम केले आहे.

‘निळकंठ’बद्दल बोलताना डॉ. काजल मुगराई म्हणाल्या, “पारलौकिकता आणि मनोविज्ञान या क्षेत्रांत मी आता दशकभर काम करते आहे. तसेच, मनोरंजन क्षेत्रातही मी यापूर्वी काम केले आहे. या दोन्ही क्षेत्रांचा उत्तम मिलाफ साधता येईल असे काहीतरी घडवण्याचा मी अनेक वर्षे विचार करते आहे. गेले वर्षभर आम्ही निळकंठ या निर्मितीवर काम करीत असून आम्ही कल्पिल्याप्रमाणेच प्रेक्षकांसमोर हा ब्रॉडवे सादर करण्यासाठी आता आम्ही सज्ज झालो आहोत. आमचा हा प्रयत्न सर्वांना नक्की आवडेल, अशी आम्हाला आशा आहे.”

म्हाळसा या संस्थेत २०० हून अधिक कुशल माणसांची फौज असून गुणवत्ता आणि प्रोत्साहक कलाकारांसाठीचा हा मंच बनला आहे असं त्या म्हणतात. ही जागतिक दर्जाची कलाकृती पूर्ण झाल्यावर ही टीम आपले अनुभव सर्वांसह शेअर करणार आहे.