बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून चित्रपटापेक्षा त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’ यामुळे चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी कास्टिंग काउचचा एक भयानक अनुभव सांगितला आहे.

नीना गुप्ता यांनी त्यांच्या या पुस्तकात कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. जेव्हा एका निर्मात्याने त्यांना हॉटेल रूममध्ये बोलावलं तेव्हा त्या थंड पडल्या होत्या. निर्मात्याने एक रात्र त्याच्यासोबत घालवण्यास सांगितली होती. हा निर्माता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित होता. त्यावेळी नीना मुंबईच्या जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये परफॉम करत होत्या. यानंतर नीना निर्मात्यास भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचल्या. पण जेव्हा निर्मात्याने नीना यांना लॉबीत भेटण्याऐवजी त्याच्या रूममध्ये बोलावले तेव्हा त्यांना विचित्र वाटलं.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

नीना यांनी पुस्ताक लिहिले, “माझ्या मनाने मला सांगितले की वरती रूममध्ये जाऊ नको आणि त्याला खाली यायला सांग.” परंतु, नीना यांना हातात आलेली ही संधी गमावण्याची इच्छा नव्हती आणि त्या निर्मात्याच्या रूममध्ये गेल्या. त्यानंतर निर्मात्यांनी सांगितले की त्याने अनेक अभिनेत्रींना लॉन्च केले आहे. तर, निर्मात्यांनी दिलेली भूमिका त्यांना आवडली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

शेवटी नीना यांनी निर्मात्यांना विचारले, “तर माझी भूमिका काय आहे?” निर्मात्याने सांगितले की तुला हीरोइनच्या मैत्रिणीची भूमिका साकारावी लागेल. त्यानंतर नीना यांनी तिथून निघत असल्याचं निर्मात्यांना सांगितलं. तर, निर्माता म्हणाला, “तू कुठे जातेस? तू इथे रात्रभर नाही राहणार?” हे ऐकताच नीना यांचे शरीर थंड पडले. त्यानंतर त्या लगेच तिथून निघाल्या.

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

दरम्यान, नीना गुप्ता यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसले. तर लवकरच, नीना या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. अमिताभ आणि नीना यांच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि पावेल गुलाटी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे विकास बहल करणार आहेत.