News Flash

कधीकाळी ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र?

नीतू कपूर खरंच ऋषी कपूर यांना प्रेमपत्र लिहून देत होत्या का?

बॉलिवूडमधील मोस्ट आयकॉनिक कपल म्हणून आजही अभिनेत्री नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. १९६६ साली कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या नीतू कपूर यांचा आज वाढदिवस. दरवर्षी नीतू कपूर यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र यावेळी ऋषी कपूर यांच्याशिवाय त्यांना वाढदिवस सेलिब्रेट करावा लागणार आहे. विशेष म्हणजे ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरीदेखील त्यांच्या आठवणी प्रत्येकासोबत आहेत. त्यामुळे नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. यातच एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी नीतू कपूर या चक्क ऋषी कपूर यांच्या प्रेयसीला लव्हलेटर पाठविण्यासाठी मदत करायच्या असं सांगण्यात येत आहे.

‘जनसत्ता’च्या माहितीनुसार, एकेकाळी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्या मैत्रीचेदेखील अनेक किस्से आहेत. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे हे दोघंही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट शेअर करत होते. यामध्येच ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडविषयीदेखील नीतू कपूर यांना माहित होतं. विशेष म्हणजे अनेक वेळा ऋषी कपूर यांना गर्लफ्रेंडला प्रेमपत्र लिहिण्यासाठी नीतू कपूर यांनी मदत केली होती. इतकंच नाही तर त्यांनी स्वत: काही प्रेमपत्र ऋषी कपूर यांना लिहून दिली होती.

दरम्यान, त्याकाळी ऋषी कपूर यास्मीन मेहता हिला डेट करत होते. त्याचवेळी डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या अफेअरविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. हा दुरावा दूर करण्याचा नीतू कपूर प्रयत्न करत होत्या. मात्र त्याचवेळी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची जवळीक वाढली आणि तेच एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि अनेक वर्ष एकमेकांची साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:07 pm

Web Title: neetu kapoor birthday neetu used to write love letters to patchup with rishi kapoor and his girlfriend unknown fact ssj 93
टॅग : Rishi Kapoor
Next Stories
1 पावसाला थांबवण्यासाठी अभिनेत्री झाली ‘रेन पोलीस’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
2 ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरमध्ये सुशांतने घातलेल्या टी-शर्टने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
3 छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी होणार विभक्त ; मानिनी डे- मिहिर मिश्रा घेणार घटस्फोट?
Just Now!
X