News Flash

Video: नेहा कक्करने केली अमिताभ बच्चन यांची नक्कल, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती तिच्या गाण्यांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सध्या इंडियन आडयलमध्ये परिक्षक म्हणून काम करत असल्याचे दिसत आहे. शोमध्ये ती मजा मस्ती देखील करत असते. नुकताच सोशल मीडियावर नेहाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नक्कल करताना दिसत आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर नेहाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा सेटवर ‘नेहू का गेम’ खेळताना दिसत आहे. या गेममध्ये ती बाकी दोन परिक्षक विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया यांना प्रश्न विचारत आहे. त्यांनी तिच्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे द्यायची आहेत. ही उत्तरे पंजाबीमध्ये हो की नाही अशा स्वरुपात द्यायची आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar ☆ (@neheart_jyoti07)

दरम्यान नेहा पहिला प्रश्न विचारायला सुरुवात करते तेव्हा विशाल दादलानी अमिताभ बच्चन यांची नक्कल करताना दिसत आहे. ते पाहून नेहा देखील अमिताभ यांची नक्कल करते. सध्या सोशल मीडियावर नेहाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 12:37 pm

Web Title: neha kakkar imitates amitabh bachchan on indian idol set avb 95
Next Stories
1 जिजाचा भन्नाट स्वॅग! पाहा अक्षयाचा हटके व्हिडीओ
2 कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात; प्राजक्ताने दिल्या शुभेच्छा
3 “कृषी कायदे रद्द केल्यास शेतकरी आणखी मागे जाईल”
Just Now!
X