छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’मध्ये काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा पेंडसेची एण्ट्री झाली. ती सध्या मालिकेत अनिता भाभी हे पात्र साकारत आहे. यापूर्वी अभिनेत्री सौम्या टंडन ही भूमिका साकारत होती. पण सौम्याने मालिका सोडताच नेहा पेंडसे या भूमिकेत दिसत आहे. काही दिवासांपूर्वी नेहाने बॉयफ्रेंड शार्दुलशी लग्न केले. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये तिने भविष्यात बोल्ड सीन देण्याविषयी वक्तव्य केले.
नुकतीच नेहाने ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला बोल्ड सीन देण्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने भविष्यात बोल्ड सीन देण्यास मला कोणतीही समस्या नाही. पण केवळ अशा चित्रपटांमध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरत असते. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन. चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळाली जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन असे नेहा म्हणाली.
आणखी वाचा: ‘लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगचा माझ्या नवऱ्यावर…’, नेहा पेंडसेचा खुलासा
View this post on Instagram
पुढे नेहा म्हणाली, पण काही चित्रपट ज्यांची कथा केवळ किसिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीनच्या भोवती फिरत असते अशा चित्रपटांमध्ये मी काम करु इच्छित नाही. मी चांगले बोल्ड सीन देखील पाहिले आहेत. ते चांगले का आहेत कारण निर्मात्यांनी ते तशा पद्धतीने शूट केले आणि चित्रपटांमध्ये दाखवले. कधी कधी सीन चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2021 10:47 am