23 September 2020

News Flash

‘अश्रफ भाटकरची भूमिका साकारणं म्हणजे…’; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

सपनाने स्वत:च्या दु:खावर मात करुन माफिया क्वीन झाली

अनुजा साठे

कुख्यात डॉन दाउद इब्राहिमला जीवे मारण्याचा निश्चय करणाऱ्या सपनाचा जीवनप्रवास लवकरच ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजमधून उलगडण्यात येणार आहे. ही सीरिज एमएक्सप्लेअरवर प्रदर्शित होणार असून नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री अनुजा साठे मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे अनुजा पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत असून ही भूमिका साकारणं तिच्यासाठी किती आव्हानात्मक होतं हे तिने सांगितलं.

सपना हे नाव अनेकांच्या परिचयाचं असेल. दाऊद सारख्या कुख्यात डॉनला मारण्याचा विडा अश्रफ भाटकर अर्थात सपना उचलते आणि दाऊदला मारण्यासाठी शक्य होतील तितके प्रयत्न करते. दाऊदमुळे सपनाचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होतं. तिचा नवरा आणि बाळ ती कायमचं गमावते याच दु:खाचं सूड भावनेत रुपांतर होतं आणि ती दाऊदला मारण्याचा निश्चय करते. विशेष म्हणजे या सीरिजमधून सपनाच्या स्वभावाचा प्रत्येक भाग अलगदपणे उलगडण्यात आला आहे. तिचं नवऱ्यावरचं प्रेम, मैत्री आणि त्यानंतर दाऊदविषयी असलेला मनातील राग हे अभिनेत्री अनुजाने उत्तमरित्या साकारले आहेत. मात्र सपनाच्या स्वभावाचे हे पैलू उलगडणं आव्हानात्मक असल्याचं अनुजाने सांगितलं. एका सत्यघनेपासून प्रेरित होऊन या सीरिची निर्मिती करण्यात आली आहे.

“आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण पुरुष माफिया किंवा डॉन पाहिले असतील. मात्र एक थी बेगममधून एका महिला माफियाची कथा उलगडण्यात आली आहे. ही अशी स्त्री आहे, जी स्वत:च्या दु:खावर मात करुन माफिया क्वीन बनते. यापूर्वी मी विविध भूमिका साकारल्या आहे. मात्र ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती”, असं अनुजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “ही भूमिका आव्हानात्मक असली तरीदेखील मला ती हातून जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे मी या सीरिजसाठी होकार दिला.अश्रफच्या आयुष्यात अनेक छटा आहे. त्या पडद्यावर साकारणं हे आव्हान होतं. मी या भूमिकेत भावनिक आणि मानसिकरित्या प्रचंड गुंतले होते. त्यामुळे मला खात्री आहे ही भूमिका तुम्हाला नक्कीच आवडेल”.

दरम्यान, सचिन दरेकर दिग्दर्शित ही सीरिज १४ भागांची आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ती प्रदर्शित होणार आहे. तसंच अनुजा साठेसह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे या सीरिजमध्ये झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 3:40 pm

Web Title: new webseries ek thi begum marathi actress anuja sathe share her experience ssj 93
Next Stories
1 ‘पुन्हा फालतू ट्विट करू नकोस’; भाजपाच्या आयटी सेलनं सिद्धार्थ चांदेकरला सुनावलं
2 ‘माझं नाव चँग आहे करोना व्हायरस नाही’; चिनी समजून हिणवणाऱ्यांना अभिनेत्याने सुनावले
3 Video :अमिताभसह ११ कलाकारांनी आपापल्या घरातून केलं ‘या’ शॉर्टफिल्ममध्ये काम
Just Now!
X