20 October 2020

News Flash

नववर्षात किंग खानची चाहत्यांना अनोखी भेट

शाहरुखचा कधी न पाहिलेला अवतार येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक आनंद एल राय, शाहरुख खान

‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक आनंद एल राय २०१८ च्या अखेरीस एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यासोबतच टीझरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी किंग खानने चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे असं म्हणायला हरकत नाही.

यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘झिरो’ असं त्याचं नाव आहे. टीझरची युट्यूब लिंक पोस्ट करत शाहरुखने ट्विटरवर लिहिलं की, ‘टिकटें लिए बैठे हैं लोग मेरी जिंदगी की, तमाशा भी पूरा होना चाहिए!’ पागल, आशिक, शायर, मक्कार, मेंटल, दिलदार, धोखेबाज, खोटा, कमीना, मतलबी, छिछोरा, जोकर असे अनेक शब्द टीझरच्या सुरुवातीला पाहायला मिळतात आणि त्यानंतर समोर येतो तो शाहरुखचा ‘झिरो’ अवतार. ‘तुमको हमपे प्यार आया..,’ या जुन्या गाण्यावर शाहरुख थिरकताना दिसतो. त्याचा कधीच न पाहिलेला हा अवतार आणि चित्रपटाचं नाव पाहून प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

वाचा : आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं?

या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. शाहरुखसोबतचा अनुष्काचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘जब हॅरी मेट सेजल’ प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकला नव्हता. तेव्हा आता ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 6:14 pm

Web Title: new year gift for shah rukh khan fans anand l rai film zero teaser released
Next Stories
1 VIDEO : खिलाडी कुमारची नव्या वर्षात झेप
2 आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं?
3 गरोदरपणाविषयी विद्या काय म्हणतेय ऐकलं का?
Just Now!
X