News Flash

“अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी

अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे पायल संतापली आहे. “जर अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन.”, अशी धमकी तिने पोलिसांना दिली आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

पायलचे वकिल नितिन सातपुते यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली. “आम्ही अनुराग विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. जर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही तर पायल उपोषणाला बसेल.” असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 5:42 pm

Web Title: payal ghosh hunger strike anurag kashyap casting couch in bollywood mppg 94
Next Stories
1 Video: नेहा कक्कर आणि बदशाहचे नवे गाणे प्रदर्शित
2 ‘त्या’ व्हिडीओबद्दल कोरिओग्राफर टेरेन्सची बाजू घेत नोराने नेटकऱ्यांना सुनावले
3 “स्वार्थ असल्याशिवाय ती कोणाच्याही बाजूने बोलत नाही”; सोना मोहापात्राने केली कंगनावर टीका
Just Now!
X