News Flash

“मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का?”, ‘त्या’ व्हिडीओ नंतर पायल रोहतगी ट्रोल

पायलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बंगाल विधानसभा निवडणुकींनंतर देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. यानंतर देशातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतला तर बंगाल निवडणूकींवर परखड मत मांडणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलंय. कंगना नंतर अभिनेत्री पायल रोहतगीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केलाय.

अभिनेत्री पायल रोहतगीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात पायलला अश्रू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय. ती या व्हिडीओत ओक्साबोक्शी रडताना दिसतेय. तर दुसरीकडे ती व्यवस्थेवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना दिसतेय. पायलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केलीय.

या व्हिडीओत पायल म्हणतेय, “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही. जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्यासोबत तुम्ही असे वागता. लोक तुमचे फोटो लावून डॉक्टर बनत आहेत. लोकांची फसवणूक करत आहेत . मोदीजी हे ठिक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करायचा का? आम्हालाच का टार्गेट केलं जात? ” असे सवाल पायलने उपस्थित केले आहेत. या संपूर्ण व्हिडीओत तिला अश्रू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय.

पायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिची थट्टा उडवलीय. ” कंगनाचं दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.” असं म्हणत पायलला ट्रोल केलं. तर एक युजरने ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कट कर अशा आशयाच मीम शेअर करत पायलला ट्रोल केलंय.

वाचा:आयुष्यमान खुरानाच्या पत्नीने पहिल्यांदा शेअर केला ‘असा’ व्हिडीओ, म्हणाली “हे दु:ख मी कधीही..”

तर एका युजरने पायलचा हा व्हिडीओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेवणही गेलं नसेल असं म्हणत पायलवर निशाणा साधला आहे. तसंच एका युजरने हा व्हिडीओ एटीट करून यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा काही भाग जोडत पायलची थट्टा केलीय.

ट्रोल होण्याची पायलची ही पहिली वेळ नव्हे. या आधी देखील पायलने अनेकदा वादग्रस्त विषयांमध्ये उडी घेत आपलं मत मांडलं आहे. यात अनेकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 3:25 pm

Web Title: payal rohatagi share video blame pm narendra modi video goes viral netizens troll her kpw 89
Next Stories
1 ‘फुकरे’ फेम मनजोत सिंहने करोनाग्रस्त भावासाठी मागितली मदत; आधी केलं ट्विट नंतर केलं डिलीट ?
2 लग्नाच्या वाढदिवशी करोना पॉझिटिव्ह, सुव्रत म्हणतो ‘अनोखी भेट’
3 करोनामुळे मुलाने गमावले वडिलांना, सलमान खान आला मदतीला धावून
Just Now!
X