News Flash

शाळेच्या पाठ्यपुस्तकात सुशांत सिंह राजपूतचा फोटो ? ; व्हायरल होत आहेत सुशांतचे हे फोटोज

"शिक्षण मंडळाला ही कळलं...."

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आता वर्ष पूर्ण होईल, पण तरीही त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही बसलेला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या चांगल्या आणि प्रेमळ स्वभावामूळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. भलेही तो आज आपल्यात नसेल परंतु, त्याने केलेल्या काही गोष्टी त्याच्या चांगुलपणाची साक्ष देतात. त्याच्या याच चांगूलपणाची पोचपावती त्याच्या निधनानंतरही मिळताना दिसून येतेय.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय की, बंगालच्या एका शाळेच्या पाठ्यपुस्तकात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या फोटोचा समावेश करण्यात आला आहे. यात सुशांतची गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधल्या मानवचा फोटो वापरण्यात आलाय.

बंगालच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना कुटुंबाचे काय महत्त्व असतं, हे शिकण्यासाठी सुशांतचा फोटो वापरण्यात आलाय. या फोटोमध्ये सुशांत एका वडिलाच्या भूमिकेत दिसून येतोय. सुशांतची मैत्रिण स्मिता पारेख हीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करून माहिती दिली. या फोटोमध्ये सुशांतसोबत अंकिता लोखंडे सुद्धा दिसतेय. स्मिता पारेखने हा फोटो शेअर करताना लिहिलं की, “हे पाहून मला खूप अभिमान वाटतोय. शिक्षण मंडळाला देखील सुशांत बेस्ट होता हे कळलंय.”

आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा फोटो शेअर करताना युजरने लिहिलं की, “हे माझ्या चुलत बहिणीच्या विज्ञानाचे पुस्तक आहे…ती तिसरी इयत्तेत शिकतेय. या पुस्तकात माणूस कसा असतो, जनावरे कसे असतात हे सांगितलंय. पण तिच्या पुस्तकात माणूस कसा असतो हे दाखण्यासाठी सुशांतचा फोटो वापरलाय. हे पुस्तक बांगाली भाषेत आहे. सुशांतची गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत त्याचं नाव ‘मानव’ होतं. याच कारणांसाठी कदाचित माणूस आणि जनावरे यांच्यातला फरक समजवण्यासाठी सुशांतचा ‘मानव’ म्हणून फोटो वापरण्यात आलाय.

34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील वांद्र्यातील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या सीबीआय करीत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला लुटल्याचा आरोप केल्याने सुशांतच्या कुटूंबियांनी केला. त्यानंतर ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 10:39 am

Web Title: photo of sushant singh rajput printed in school text book explained to the children how human is prp 93
Next Stories
1 डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर कॉमेडियन सुनील पालने मगितली माफी
2 मिलिंद सोमणने शेअर केला तरुणपणीचा फोटो, पत्नी अंकिता म्हणाली..
3 सलमानला दिशा म्हणाली ‘स्वीट’; जॅकी श्रॉफ बोलले ‘सुना तू बहुत डेंजरेस है…..!’
Just Now!
X