04 August 2020

News Flash

शिंदे पिता-पुत्र म्हणतायत ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’

डीजे ला आईची शपथ देऊन त्याच्या तालावर तरूणाईची पाऊलं थिरकताना पाहावयास मिळत आहेत.

‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’… या गाण्याच्या निमनित्ताने प्रथमचं मराठीतही डीजे ने प्रवेश केलायं.

वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा १२ फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच. पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’… या गाण्याच्या निमनित्ताने प्रथमचं मराठीतही डीजे ने प्रवेश केलायं. शिवाय, नवीन पोपट हा म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे, आनंद शिंदे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत याचं क्षेत्रात करीअर करण्याचा ध्यास घेऊन तरूणाईला आपल्या आवाजाने भूल घालणारा त्यांचाच सुपुत्र आदर्श शिंदे यांची जोडी सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर येते आहे. या दोघांवर प्रेक्षक गेली कित्येक वर्ष प्रेम करत आहेत. तितकचं प्रेम या गाण्यावर होताना दिसत आहे. सध्या पार्टींमध्ये हे गाणे खूप वाजत आहे. डीजे ला आईची शपथ देऊन त्याच्या तालावर तरूणाईची पाऊलं थिरकताना पाहावयास मिळत आहेत. वरात जोमात म्हणत गावाला कोमात पाठवणाऱ्या या डीजे चे शब्द क्षितीज पटवर्धनने लिहिलेत. तर या उत्तम शब्दमांडणीला संगीत दिले आहे अमितराज या संगीत दिग्दर्शकाने.
बाप-लेकाच्या या जोडीने दिलेले हे गाणे पार्टीमध्ये नवा रंग भरण्यात यशस्वी होईल, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 1:07 am

Web Title: poshter girl 1st duo song of anand aadarsh
टॅग Poshter Girl
Next Stories
1 ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘आईस वॉटर’ लघुपटाची बाजी
2 शनि देवाचे एक वेगळे सकारात्मक रूप.. ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’
3 ‘आम्ही ‘ते’ बदल पूर्ण करूनच सिनेमा प्रदर्शित करू’
Just Now!
X