News Flash

अर्ध्या तासांत सगळं संपवून टाकेन; प्रत्युषा बनर्जीचे ‘ते’ शेवटचे शब्द

प्रत्युषाला न्याय मिळवून देण्यासाठी तिचे आई-वडील न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. पण अद्याप या प्रकरणात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

prattusha-banrjee-suiside
(File Photo)

१ एप्रिल २०१६ रोजी ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतल्याची बातमी आली आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. केवळ २४ वर्षाच्या प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरून गेलं होतं. पण तिच्या मृत्यूचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. तिचे आई-वडील आजही कोर्टात न्यायासाठी फेऱ्या मारत आहेत आणि एक ना एक दिवस प्रत्युषाला न्याय मिळेल याची आशा ठेवली आहे.

२०१६ साली थोडं मागे वळून पाहिलं तर प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बातमीनंतर जवळजवळ सर्वच माध्यमांवर तिच्या मृत्यूबाबत चर्चा सुरू झाली होती. हैराण झालेल्या लोकांपासून ते सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियेपर्यंत सगळ्याच घडामोडींना वेग आला. तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज देखील बाहेर येऊ लागले. प्रत्युषा बॅनर्जी मृत्यू प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी कथित बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याच्यावर प्रत्यूषाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याबाबत गंभीर आरोप केले.

हे देखील वाचा: “पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी १ एप्रिल २०१६ रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोस्टमॉटर्म रिपोर्टनुसार तिचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याचं सांगण्यात आलं. तिच्या मृत्यू प्रकरणाच्या सुरवातीला प्रत्युषाने एक सुसाइड नोट देखील लिहिली असल्याचं सांगण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषा बॅनर्जीने मृत्यूच्या एक दिवस आधी गर्भपात केला होता. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वीपासूनच ती प्रेग्नंट असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

प्रेमात विश्वासघात मिळाल्यानंतर प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येचे पाऊल उचलले असा देखील अंदाज या प्रकरणात लावण्यात आला होता. त्यानंतर प्रत्युषा बॅनर्जीच्या प्रेग्नंट असल्याच्या बातमीने हे प्रकरण आणखी गंभीर बनले. पण गेल्या पाच वर्षात या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

प्रत्युषा बॅनर्जीचे हे होते शेवटचे शब्द

प्रत्युषा बॅनर्जीचे आई-वडीलने वकीलांकडे काही पुरावे सादर करत तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत तिचं शेवटचं बोलणं झालं असल्याचं सांगितलं. त्या दोघांमध्ये संवाद झाल्याचे अनेक पुरावे देखील देण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषा बॅनर्जी नशेत होती आणि तिने बॉयफ्रेंड राहुलसोबत शेटवची बातचीत केली होती.

हे देखील वाचा: श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…

प्रत्युषा बॅनर्जीता बॉयफ्रेंडसोबतचा अखेरचा संवाद

प्रत्युषा बनर्जी : काही उरलंच नाही, सगळं संपलंय.
राहुल राज सिंह: काम धाम का ?
प्रत्युषा बनर्जी : मी मेल्यानंतर सगळं संपेल.
राहुल राज सिंह: एका छोट्याश्या कारणासाठी ?
प्रत्युषा बनर्जी : हे कारण छोटं नाही
राहुल राज सिंह: काय आहे
प्रत्युषा बनर्जी : कारण हे आहे की, मी कॅरेक्टरलेस नसून सुद्धा मला कॅरेक्टरलेस बोललं जातं. त्यात आणखी मला धमकावलं जातं. माझ्या आई-वडिलांना मारून टाकतील, सगळ्यांना मारून टाकतील. जे नाही ते मला बोलावं लागतंय.
प्रत्युषा बनर्जी : बाळ…बाळ….बाळ…आता त्याच्या जन्मच होणार नाही.
राहुल राज सिंह : हे बघ, मी भेटून बोलतो तुझ्यासोबत आता
प्रत्युषा बनर्जी : अर्धा तास, दहा मिनीटानंतर मी नसेन
राहुल राज सिंह : जर…जर….तुझ्यात थोड जरी माणुसकी असेल
प्रत्युषा बनर्जी : मी खूप वेळ पासून फोन करतेय. रात्री सुद्धा

डिप्रेशनमध्ये होती प्रत्युषा

प्रत्युषा बॅनर्जी बद्दल बोलताना तिच्या मित्रांनी सांगितलं होतं की, ती तिच्या करिअरमध्ये खूप आनंदी होती. पण तिच्या खाजगी आयुष्यात जे चढ-उतार सुरू होते त्यामुळे ती खूपच चिंतेत होती.

प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडची काय होती प्रतिक्रिया?

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी बॉयफ्रेंड राहुलवर आरोप केले. सुप्रिम कोर्टातून जेव्हा त्याला जामीन मिळाला, त्यानंतर राहुलने सर्व आरोपांचे खंडन करत म्हणाला, “प्रत्युषा तिच्या आर्थिक अडचणीमुळे डिप्रेशनमध्ये होती. तिच्यावर बरेच कर्ज होते आणि त्यामूळे ती चिंतेत होती.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2021 3:52 pm

Web Title: pratyusha banerjee death pratyusha banerjees last conversation with boyfriend rahul prp 93
Next Stories
1 “पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं
2 तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; ‘या’ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…
Just Now!
X