01 October 2020

News Flash

निक आला मांडवापाशी..

लग्नानंतर मुंबई आणि दिल्लीत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास म्हणजेच निकयांका (टोपणनाव) यांचा विवाह शनिवारी ख्रिश्चन पद्धतीने पार पडला असला तरी रविवारी हे जोडपे हिंदू पद्धतीने  पुन्हा विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळे  ‘निक आला मांडवापाशी’ अशी भावना प्रियांकाच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत असून परदेशी जाऊन लग्न करण्याचा कल असताना प्रियांकाने देशी बाणा जपत भारतातच लग्न केलं आहे.

निक जोनास हा लोकप्रिय गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. त्यामुळे रविवारी हिंदू पद्धतीने होणाऱ्या लग्नात ते हिंदी गाणी गाणार का? इथपासून ते त्याची भारतीय वेशभूषा, भारतीय खाद्यपदार्थाविषयी आवड कशी आहे?, हे सगळं जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन’मधील प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नर म्हणजेच प्रियांकाच्या जाऊबाई लग्न सोहळ्यात पारंपरिक भारतीय वेशभूषेत असणार आहेत. अभिनेत्री परिणिती चोप्राही भलतीच खूश असून ती या लग्न सोहळ्यात बहीण म्हणून मिरवून घेण्यासह मानपानही करून घेणार आहे.

लग्नानंतर मुंबई आणि दिल्लीत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांना जोधपूरला जाता येणार नाही अशी खाशी मंडळी दोन्ही ठिकाणच्या स्वागत समारंभाला हजर राहणार आहेत. अमेरिकन वऱ्हाडींसमोर आपला देशी अंदाजही कुठे कमी राहू नये, वऱ्हाडाने आणि यजमानांनी फेटय़ाच्या आठवणी काढत हा लग्न सोहळा स्मरणात ठेवावा अशी इच्छा प्रियांकाच्या चाहत्यांची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:15 am

Web Title: priyanka chopra and nick jonas got married
Next Stories
1 रजनीकांतच्या ‘२.०’ चित्रपटाची दोन दिवसांत शंभर कोटींची कमाई
2 वेबवाला : व्यापार, साम्राज्यविस्तार आणि स्वातंत्र्य
3 ‘ही’ व्यक्ती करणार प्रियांकाचं कन्यादान
Just Now!
X