News Flash

आपला ‘तो’ सीन पाहून प्रियांकाने लपविला चेहरा

क्रश कोणाबद्दल होता यावर प्रियांकाने मौन बाळगले.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेल्या प्रियांकाला तिच्या जुन्या अभिनयाने चेहरा लपविण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. हॉलिवूडमधील क्वांटिको २ या मालिकेत व्यस्त असणारी प्रियांका बऱ्याचदा छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात देखील सहभागी होत असते. नुकतीच प्रियांकाने ‘व्हॉट हॅपन्स लाइव्ह’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये प्रियांकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना तिने आपल्या हटके आणि मजेदार अंदाजात उत्तरे दिली. तिला विचारण्यात आलेल्या प्रश्न उत्तरानंतर कार्यक्रमाच्या अखेरीस प्रियांकाच्या जुन्या चित्रपटातील क्षणचित्रे दाखविण्यात आली. यावेळी आपल्या जुन्या अभिनयाला पाहुन प्रियांका चक्क चेहरा लपविताना दिसली.

या कार्यक्रमामध्ये प्रियांकाच्या ‘मुझ से शादी करोगी’ या चित्रपटातील काही क्षणचित्र दाखविण्यात आली. या चित्रपटामध्ये प्रियांका अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत दिसली होती. पहिला सीन प्रियांकाने एन्जॉय केला. पण ज्यावेळी दुसरा सीन सुरु झाला त्यावेळी प्रियांकाने आपला चेहरा लपविण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या ‘अंदाज’ या चित्रपटातील अभिनयाने प्रियांकाला अक्षरश: लाजवले. आपल्या जुन्या अभिनयावर हसत प्रियांकाने हा चित्रपट माझ्या सुरुवातीचा असल्याचे सांगितले.

प्रियांकाला या कार्यक्रमातील एका सत्रामध्ये प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हो किंवा नाही असे उत्तर द्यायचे होते. हो आणि नाही हे सांगण्यासाठी आयोजकांनी ग्लासमध्ये पाणी ठेवले होते. जर उत्तर होकार्थी असेल तर प्रियांकाला ग्लासमधील ड्रिक घ्यायचे होते.  नकारार्थी उत्तरास  जैसेथे थांबायचे होते. या फेरीत कधी तिजोरीतून चोरी केली आहेस का? असा प्रश्न प्रियांकाला  विचारण्यात आला. यावेळी प्रियांकाने ड्रिंक घेतले नाही. अर्थात चोरीची आपल्यावर कधीच वेळ आले नसल्याचे संकेत दिले.  पण ज्यावेळी तिला क्रश बाबत विचारण्यात आले त्यावेळी तिने ड्रिक घेऊन क्रश होता हे मान्य केले. पण हा क्रश कोणाबद्दल होता यावर प्रियांकाने मौन बाळगणे पसंत केले.

आपल्या जुन्या ‘अंदाज’ चित्रपटातील अभिनयावर स्वत:च्या अभिनयावर हसणाऱ्या प्रियाकाने बॉलिवूडनंतर  आता हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हॉलिवूडमधील ‘क्विटिको’च्या यशानंतर ती लवकरच ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2016 9:24 pm

Web Title: priyanka chopra felt embarrassed on watching the scene of her first movie
Next Stories
1 मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान उपेंद्र लिमयेच्या हाताला दुखापत
2 ‘माझ्या आईला वाटायचे अक्षय कुमार गे आहे’
3 पाचशे-हजारच्या नोटांवरील बंदीचा अजय देवगणला फटका
Just Now!
X