News Flash

प्रियांका चोप्रा म्हणते, “ही गोष्ट खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही”

एका मुलाखतीमध्ये प्रियांकाला तिच्या मध्यमवर्गीय सवयीबद्दल विचारण्यात आले

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमधील देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता जागतिक स्तरावरील सेलिब्रिटी झाली आहे. हिंदी सिनेमापासून सुरु झालेला प्रियांकाचा प्रवास अगदी क्वांटिकोपर्यंत गेला आहे. त्यातच मागील वर्षी अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यापासून ती अधिक काळ अमेरिकेत राहू लागली आहे. मात्र असं असलं तरी आपल्यातील भारतीयपणा थोडाही कमी झालेला नाही असं सांगताना प्रियंकाने एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे. खाण्यापिण्याच्या बाबातीत आपण अगदी टीपीकल इंडियन असून एक खास भारतीय गोष्ट जेवणामध्ये नसेल तर मला जेवण पुर्ण झाल्यासारखं वाटतं नाही असा खुलास प्रियांकाने केला आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी प्रियांका तशी मध्यमवर्गीय घरामधीलच. फॅशन सिनेमापासून आपल्या अभिनयाने सिने समिक्षकांबरोबर चाहत्यांचेही मन जिंकणारी प्रियांका मजल दरमजल करत आज जागतिक स्तरावरील स्टार झाली आहे. असं असलं तरी तीने तिच्या काही खास भारतीय गोष्टी सोडलेल्या नाही. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या आवडी निवडी. “न्युयॉर्कला आल्यावर मी भारतीय जेवण खूप मिस करते. विदेशामध्ये प्रत्येक पदार्थ बंद डब्यातच मिळतो आणि मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे कधी कधी मला या गोष्टीचा फार त्रास होतो”, असं प्रियांकाने नुकतचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या याच सिनेमाच्या प्रमोशनादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल बोलताना स्वतःच्या एका खास सवयीबद्दल तिने खुलासा केला. ‘इस्ट इंडिया कॉमेडी’ या मिडिया कंपनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाला तिच्या एका मध्यमवर्गीय सवयीबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी प्रियांकाने ‘मला माझ्या जेवणासोबत नेहमीच लोणचं लागतंच. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही. मला लोणचं खूप आवडतं. मी अनेकदा सॅन्डविचबरोबरही लोणचं खाते,’ असं उत्तर दिलं. तसेच तिने चाहत्यांना एक सल्लाही दिला. “जर तुम्ही चीज सॅन्डविच खात असाल तर त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यात करून घरगुती आंब्याचं लोणचं सर्वात बेस्ट असतं,” असंही प्रियांका म्हणाली.

दरम्यान, प्रियांकाने ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. प्रियांकाने या आधी २०१६ मध्ये ‘जय गंगाजल’ या चित्रपटात काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 11:29 am

Web Title: priyanka chopra jonas talks about her middle class habit of liking mango pickle scsg 91
Next Stories
1 ..म्हणून सलमान- ऐश्वर्याचे लग्न होऊ शकले नाही
2 ‘माझ्या गाण्याचं रिमिक्स केलं तर याद राखा’
3 Photo : ‘शोले’ मधील सुरमा भोपाली पाहा आता कसे दिसतात
Just Now!
X